“प्रभात’ने वाचकांची मने जिकंली : तेजस्वी सातपुते

वर्धापनदिनी  भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा

सातारा, दि.2 (प्रतिनिधी)

सातारा जिल्ह्यात अवघ्या एका वर्षातच दै. “प्रभात’ने परखड बातमीदारीच्या माध्यमातून वाचकांची मने जिंकल्याचे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले. पोलीस करमणुक केंद्रात आयोजित प्रथम वर्धापनदिन स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. अरुण खोत, “प्रभात’चे महाव्यवस्थापक बी. एल. स्वामी, लेखाधिकारी रवी इंडी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर यांच्यासह जिल्ह्यातील वाचक, जाहिरातदार, हितचिंतक व प्रभात परिवारातील बातमीदार उपस्थित होते.

सातपुते म्हणाल्या, “”कोणत्याही संस्थेला समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी एक वर्षाचा काळ हा पुरेसा नसतो. मात्र, “प्रभात’ने अवघ्या एक वर्षातच आपल्या परखड विचारांनी जिल्ह्यातील वाचकांची मने जिंकली आहेत. चांगल्याला चांगले अन्‌ वाईटाला वाईट म्हणत “प्रभात’ने पारदर्शक बातमीदारी केल्याने अधिकारी म्हणून मला “प्रभात’ हक्काचे अन्‌ विश्वासाचे दैनिक वाटते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे म्हणाले, “”सातारा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून लौकिकास पात्र आहे. या क्रांतीकारकांना प्रेरणा देण्याचे काम प्राधान्याने दैनिकांनी केल. हीच परंपरा गेली एक वर्ष “प्रभात’ने प्रामाणिकपणे जोपासल्याने भविष्यात प्रभात वाचकांच्या आवडीचे दैनिक म्हणून पसंतीस उतरेल.” जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनीही “प्रभात’ला शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार दिलीप येळगावकर, सुनील काटकर, संग्राम बर्गे, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, नानासाहेब कदम, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रवीण पवार, अरुण दगडे, प्रीतम चव्हाण, रोहित भोसले, शिवाजी शिंदे, मालती बोराटे, गजानन फडतरे, अविनाश पाटील, राजेंद्र घाडगे, दत्तराज हिरवे, राजेंद्र माळी, युवराज आगलावे, श्‍याम पाटोळे, गणेश भोरे, कांतीलाल कांबळे, गजानन दीक्षित, रोहित पाटेकर, अमोल गायकवाड, अरुण गोसावी, वासंती लावंघरे, आमिर खान ,विक्रम देशमुख ,रमेश बोराटे, मनोज शिंदे, राजश्री जाधव, सुनीता काटे, सुनीता शिंदे, श्रद्धा कात्रे, अश्विनी भिडे, सुमन कारंडे, वीणा तरडे, सुमन तरडे, गौतम भोसले, विद्या गायकवाड, सुचित्रा कंडारकर, रतन पाटील, प्रशांत तरडे, सार्थक तरडे, रोहित ठाकूर, संयोगिता माजगावकर, विठ्ठल शेलार, बाबा शिंदे, किशोर कळके, डॉ. श्‍याम बडवे, श्रीरंग काटेकर, शैलेश मालपाणी, मधुकर खरे, सुजित जाधवराव, नंदकुमार खरे, वैभव शिंदे, संग्राम खरे, किरण गुजर, समीर गुजर, सुनील जाधव, विजय रणदिवे, हणमंत यादव, करण प्रभाळे, केदार प्रभाळे ,अरविंद कदम ,बाळासाहेब शिंदे ,शिवाजीराव इंगवले, राजेंद्र गरगटे, संदीप यादव, पी. बी. बोराटे, धनराज लाहोटी, प्रांजली खरात, मुकुंद शिंदे, सचिन ननावरे, दिलीप पांडे, धनंजय जांभळे, सयाजी चव्हाण, अरुण खोत, सुयोग दांडेकर, सागर गायकवाड, राजवर्धन कदम, हनुमंत अवघडे, चंद्रकांत कळके, माधवी कळके, किशोर ठोंबरे, अनिल फाळके, संतोष कोकरे, श्‍याम पाटोळे, प्रा. संध्या चौगुले, अमृता पाटील, रमेश घोरपडे, चेतन लंबाते जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शहर पत्रकार संघाचे विनोद कुलकर्णी, दीपक शिंदे, विठ्ठल हेंद्रे, महेंद्र खंदारे, विशाल गुजर, योगेश चौगुले, आदेश खताळ, विनय कुलकर्णी, प्रवीण जाधव, उमेश भांबरे, विशाल पाटील, राजेश सोळसकर, मोहन मस्कर-पाटील, दीपक प्रभावळकर, चंद्रकांत देवरुखकर, राजेंद्र वारागडे, दीपक देशमुख, विशाल कदम, सिद्धार्थ लाटकर, नरेंद्र जाधव, उल्हास भिडे, तबरेज बागवान, प्रगती पाटील-जाधव, शैलेंद्र पाटील, आयाज मुल्ला, आकाश यादव, एकनाथ थोरात, संदीप कुलकर्णी, संजीव अरलुलकर, संतोष कदम, गुरुनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)