जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

सातारा, दि. ३०

राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे नुकतेच गॅझेट फुटले. यामध्ये जिल्ह्यातील दोन अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर तर जिल्ह्याबाहेरील तीन अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत.

यामध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे य‍ांना सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात बदली झालेले ठिकाण. पोलीस निरीक्षक दादासो चुडाप्पा यांची पुणे शहर , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ), जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाच्या वाचक वृषाली पाटील (पुणे शहर)

तसेच जिल्ह्यात नव्याने आलेल्या अधिकार्‍यांची नावे पुढीलप्रमाणे कंसात कोठून आले ते ठिकाण.
रामचंद्र देसाई ( पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा ) उमेश हजारे ( पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची, तासगाव ) नितीन सावंत ( राज्य गुन्हे अन्वेशन विभाग ) बदली झालेल्या अधिकार्‍यांना तातडीने नव्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)