गावठी रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्यास अटक

पिरंगुट- गावठी रिव्हॉल्व्हर बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या एकास पौड पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार भालचंद्र भिंगारे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.
पौड पोलिसांनी सांगिलते की, घोटावडे गावातील हनुमान चौक येथे एक इसम कमरेला गावठी रिव्हॉल्व्हर बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग डॉ. सई भोरे-पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते, पोलीस हवालदार ए.ए. शेख, एस.एस.राक्षे, पोलीस नाईक जय पवार, बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल एस.बी.सातपुते, व्ही. व्ही.चोबे यांनी हनुमान चौक येथे साध्या वेशात सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीची झडती घेतली असता आरोपी ओंकार भिंगारे याकडे गावठी रिव्हॉल्वर सापडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)