पुणे: पुणे मनपा हद्दितील सर्व माॅल्सना टु-व्हिलर व फोर व्हिलर पार्किंगसाठी बेकायदेशीर शुल्क आकारणी बंद करण्याबाबत पुणे मनपातर्फे नोटीस देण्याचे शहर सुधारणा समितीने आदेश दिले आहेत. तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. पुणे महापालिकेने शहर सुधारणा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला.
पुण्यात मॉलची संख्या वाढली आहे त्यामुळे अनके लोक खरेदीसाठी मॉलमध्ये येतात. मात्र आपली गाडी पार्किंग करण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. याला आता लगाम बसणार आहे. पुणे मनपा हद्दीतील सर्व मॉलमध्ये आत फ्री पार्किंग असणार आहे. याबाबत सर्व माॅल्सना नोटीस पाठवण्यात आली आहे.