पुणे: पुणेरी पाट्या म्हटलं कि शब्दांचा खेळ खास पुणेरी शैलीतून शालजोडे मारण्याची पद्धत. त्यामध्ये विनोद, राग, चेतावणी ह्या सर्व गोष्टी येतात. पुण्यात अनेक ठिकाणी अश्या पाट्या नजरी पडतात. दरम्यान, पुणे शहर पोलिस व भारतीय कला प्रसारणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेरी पोलिस पाट्या उपक्रमाचा शुभारंभ पार पडला.
पुणेरी पाट्या वापरून पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यात सांस्कृतिक दुवा तयार होण्यासाठी हा उपक्रम राभवला असल्याची माहिती आहे. सदर कल्पना पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची आहे.