कोंढवळ येथील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

  • सेल्फी काढताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण खोऱ्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सध्या हा धबधबा दुथडी भरून वाहत आहे. भीमाशंकरपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंढवळ येथील धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
आदिवासी भागातील भीमाशंकर रस्त्यावर ठिकठिकाणी ओढे नाल्यांसह, घोडनदी, बुब्रा नदी दुथडी भरुन वाहत आहे. भीमाशंकरला आलेले भाविक कोंढवळ धबधब्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. सध्या सर्वत्र सेल्फीचा छंद वाढल्याने येथे येणारे हौसी पर्यटक सेल्फी घेण्याचा मोह टाळू शकत नाहीत, परंतु हा परिसर आतिवृष्टीचा आहे तर पावसाने गवत व शेवाळावरुन पडल्यास सेल्फी जिवावर बेतण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी सेल्फी काढताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी केले आहे.
भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. काही पर्यटक हे मद्यसेवन करुन गाड्या जोरदार चालवत आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडी होत आहे. यातच एस.टी स्थानकात खासगी वाहनतळ असल्यामुळे एसटी गाड्या एक ते दोन किलोमीटर अंतरावर थांबत असल्याने भाविक-भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोंढवळ : येथील धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्याटकांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)