अभियंत्याच्या मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू

अभियंत्याच्या मारहाणीत मनोरुग्णाचा मृत्यू
प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.8- मेकॅनिकल इंजिनिअरने जिन्यावरुन ढकलल्याने डोक्‍यास मार लागून एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित मनोरुग्णाने आरोपीच्या आईस शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरुन आरोपीने त्याच्याशी झटापट केली. यात मनोरुग्ण जिन्याच्या कठड्यावरुन खाली पडला. यामध्ये त्याच्या हाताच्या बोटाला आणि डोक्‍याला मार लागला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयाच उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिल रामचंद्र पगारे (52, रा.जनवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयुर उर्फ गणेश ज्ञानेश्‍वर रहाणे (30, रा. जनवाडी) याला अटक करण्यात आली आहे. सिमा अनिल पगारे (42) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचे पती अनिल आणि आरोपी मयुर समोरासमोर रहातात. दि.3जुलै रोजी अनिल याने वेडाच्या भरात मयुरच्या आईस शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरुन मयुरने अनिल यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. यानंतर झालेल्या झटापटीत त्याच्या जिन्याच्या कठड्यावर ढकलून दिले. यामध्ये अनिल गंभीर जखमी झाले होते. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एस.सरडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)