चौदा घरफोड्या करणारा चोरटा अखेर अटकेत

कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

कोल्हापूर – कुरिअर ऑफिस मध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून कोल्हापूर सह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीला आणल्यात कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे. साताऱ्याच्या फलटण मधील बबन सर्जेराव जाधव याच्याकडून पाच लाख 53 हजार रुपये रोख रकमेसह 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकाच रात्री शाहूपुरी पोलीस ठाणे आणि शहापूर पोलीस ठाणे परिसरात कुरिअर ऑफिस पुरून त्यातून रोख रक्कम चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. यानुषंगाने तपास करताना स्थानिक गुन्हे शोध पथकाने सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील रेकॉर्ड वरील संशयित बबन सर्जेराव जाधव यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. या चौकशीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ,सांगली जिल्ह्यातील एक, सातारा जिल्ह्यातील तीन, पुणे जिल्ह्यातील पाच , रायगड जिल्ह्यातील एक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन असे एकूण 14 गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

तसेच त्याच्याकडून पाच लाख 93 हजार रुपये रोख रक्कम होंडा सिटी कार एलईडी टीव्ही 2 आणि घरफोडी करता लागणारे साहित्य असा एकूण बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्याकडून कडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंची गावाचा साथीदार सतीश चव्हाण याचादेखील शोध पोलीस घेत आहेत.

हा चोरटा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यानं चोरी करण्यासाठी स्वतः चोरी केलेली होंडा सिटी कार तो वापरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे सध्या त्याचा साथीदार सतीश त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पवार यांचेसह साहाय्यक फौजदार नेताजी डोंगरे सुरेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन बंद्रे नितीन चोथे अमोल कोळेकर राजेंद्र हांडे संदीप कुंभार पांडुरंग पाटील जितेंद्र भोसले रवींद्र कांबळे संजय पाटील संतोष पाटील अजय काळे रणजित कांबळे नामदेव यादव अमर अडसूळ अमित सर्जे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.