आमदारांच्या राजीनाम्यानंतर असं आहे कर्नाटक विधानसभेतील संख्याबळाचं चित्र

बेंगळुरू – कर्नाटकातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या १३ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने कर्नाटकात सत्ताबदल घडून येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. आपल्या नाराज आमदारांनी आपले राजीनामे परत घ्यावेत यासाठी जेडीएस-काँग्रेसतर्फे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून सत्ताधाऱ्यांकडून आपल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारची पुनर्रचना करत नाराज आमदारांना परत खेचण्याचा प्रयत्न जेडीएस-काँग्रेसतर्फे करण्यात येत असला तरी या प्रयत्नांना किती प्रमाणात यश मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, १३ आमदारांच्या राजीनाम्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये कर्नाटक विधानसभेतील संख्याबळाच्या सुधारित गणितांमध्ये भाजप जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या पुढे जाताना दिसत आहे. विधानसभा अध्यक्षांसह २२५ संख्याबळ असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष हा १०५ सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष असून त्याखालोखाल काँग्रेस ७९, जेडीएस ३७, बहुजन समाज पक्ष १ व अपक्ष १ असे संख्याबळ आहे.

सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या नुकत्याच राजीनामा दिलेल्या आमदारांचा विचार केल्यास ही आकडेवारी काँग्रेस ६९, जेडीएस ३४ अशी होत आहे. अशा परिस्थितीत जर विधानसभा अध्यक्षांनी आमदारांचे राजीनामे मंजूर केले तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस आघाडी अल्पमतात जात असली तरी सरकारला विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे.

K’taka assembly strength
BJP: 105
Congress: 79-10 = 69 (ST Somashekar,BC Patil,B Basavaraj,Ramalinga Reddy,Muniratna,Mahesh Kumtalli,Pratap G Patil,Ramesh Jarkiholi,Anand Singh,Shivaram Hebbar)
JD(S): 37-3 = 34 (H Vishwanath,Gopalaiah,Narayana Gowda)
BSP = 1
1 Independent MLA

— ANI (@ANI) July 8, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.