घोडेगाव- आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (दि. 3) घोडेगाव येथील तहसील कार्यालयत उमेदवारी अर्ज दाखल केला.
दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सभा घेतली. त्यानंतर उमेदवारी अर्ज घोडेगाव येथे दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सूर्यकांत पलांडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती देवदत्त निकम, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, राष्ट्रवादीचे नेते प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी वळसे पाटील यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.