चाकण-गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या चाकण परिसरात आज सायंकाळी 5 ते 5.30च्या सुमारास विजेच्या कडकडाटसह झालेल्या वादळी पावसामुळे हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला. वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. मुसळधार झालेल्या या पावसाने काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी झाले. सुमारे दीड ते दोन तास पाऊस सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. चाकण परिसरात मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.