मुंबई – बिस्लेरी या भारताच्या आघाडीच्या मिनरल वॉटर ब्रॅण्डने जागतिक स्तरावर प्रख्यात असलेली भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची निवड आपली पहिलीवहिली ग्लोबल ब्रॅण्ड अँबॅसेडर म्हणून केली आहे. DrinkItUp या बिस्लेरीच्या नवीन अभियानासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला. ( Deepika padukon )
बिस्लेरी तर्फे करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दीपिकाचा नवा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. ‘झूम झूम झूम बाबा’ या गाण्यावर दीपिका नाचताना दिसत आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ही जाहिरात करण्यात आल्याचे यातील गाण्यावरून समजते. बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या व्हाइस चेअरपर्सन जयंती चौहान दीपिका पादुकोणची नियुक्ती ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून केल्याबद्दल म्हणाल्या, “बिस्लेरी हे हायड्रेशनचे दुसरे नाव आहे. #DrinkItUp या नवीन अभियानाच्या माध्यमातून बिस्लेरीने प्रथमच नवीन प्रयोग केला आहे. ( bollywood actress )
दीपिका पदुकोण हिने बिस्लेरीची ग्लोबल ब्रॅण्ड अँबॅसडर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “बिस्लेरीसारख्या प्रख्यात ब्रॅण्डसोबत जोडली गेल्याचा मला आनंद वाटतो. निरोगी जीवनशैली व सर्वांगीण स्वास्थ्य यांसाठी पुरेसे पाणी पिणे ही महत्त्वाची पायरी आहे असे मला कायमच वाटत आले आहे आणि बिस्लेरी DrinkItUp अभियानाच्या माध्यमातून नेमके हेच सांगत आहे.”
बिस्लेरी #DrinkItUp चे शूटिंग निर्वाणा फिल्म्सद्वारे करण्यात आले असून प्रकाश वर्मा यांनी जाहिरातीचे दिग्दर्शन केले आहे. दीपिकासोबत झालेल्या कराराचे व्यवस्थापन वेव्हमेकर आणि ग्रुपएम ईएसपी यांनी केले आहे.