सातारा: यवतेश्वर येथे दुचाकी व कारच्या झालेल्या अपघातात शाहूनगर येथील युवक जागेवर ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. शुभम श्रीरंग पवार (वय २२, रा शाहूनगर सातारा), हा दुचाकी वरून साताऱ्याहून यवतेश्वरकडे जात होता, यावतेश्वर वरून कार खाली येत असताना अपघात झाला. हा अपघातात शुभमचा जागेवर मृत्यू झाला.
अपघात झाले नंतर त्यास सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे नेले आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन पुढील कारवाही सुरू केली आहे. या बाबत पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.