पुणे जिल्ह्यातील आणखी 12 रस्ते झाले “जिल्हा महामार्ग’

पुणे – दौंड तालुक्यातील 12 इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून दर्जा बहाल करण्यात आला आहे. रस्त्यांवरील गावांची संख्या, लोकसंख्या व रस्त्यांचा होणारा वापर लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

 

दरम्यान, या रस्त्यांना जिल्हा मार्गांचा दर्जा द्या, अशी मागणी जिल्हा परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.

 

दौंड तालुक्यातील 12 रस्त्यांना जिल्हा मार्ग म्हणून दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये लोणारवाडी ते बोरीबेल स्टेशन, कुसेगाव ते कुरकुंभ रस्ता, खडकी-लोणारवाडी ते हिंगणीबेंड्री, यवत-पिंपळगाव रस्ता, कोरेगाव-भिवर-मिसळवाडी- राहू-फरगडेवस्ती ते वासुंदे, चिंचोली ते राजेगाव-नायगाव रस्ता, पडवी-माळवाडी-पाटस ते राज्य महामार्ग क्रमांक 65 पर्यंत, पाटस-बिरोबावाडी ते गार नानवीज रस्ता, नवीन गार ते बेटवाडी, लिंगाळी ते राज्य महामार्ग क्रमांक 9 रस्ता व मेमाणवाडी-पाटेठाण-टाकळी-लेंडेवाडी ते पानवली या रस्त्यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.