नवी दिल्ली/न्यूयॉर्क, दि. 21- अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) कार्यालयातील 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित “विश्वविक्रमी’ सोहळ्याचे नेतृत्व केले.
नॉर्थ लॉनवरील गॉर्डनवर झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह न्यूयॉर्कचे महापौर एरिक ऍडम, शेफ विकास खन्ना, संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा साबा कोरोसी यांच्यासह 180 देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले. त्यामुळे बहुतेक राष्ट्रीयत्वाच्या लोकांच्या सहभासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाल्याचे, यूएन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, योगामुळे संपूर्ण जग एकत्र आले आहे. योगाचा अर्थ “युनाइट’ असा आहे. मी 9 वर्षांपूर्वी इथेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण जग भारताबरोबर एक झाले.
योग भारतातून आलेला आहे. ही भारताची जुनी संस्कृती असून ती कॉपीराइट फ्री आहे. तुम्ही योग कुठेही करू शकता. ते सर्वांसाठी सर्व संस्कृतींसाठी आहे. ही जीवन जगण्याची पद्धत आहे, असेही मोदींनी म्हटले.
या कार्यक्रमाला प्रारंभ होण्यापूर्वी लॉनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्प अर्पण केले.