कुस्तीपटू दहियाची सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली -भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने अलमाटी आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये 57 किलो वजनगटातील आपले जेतेपद वाचवले आहे. त्याने अंतिम सामन्यात ईरानच्या अलीरेजा नोसरातोलाह सरलॉकला 9-4 असे पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.

दुसरीकडे भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकल्याने त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला विजेता घोषित करण्यात आले आहे. यामुळे बजरंगला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.

जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या दहियाने पूर्ण आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये दमदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या फेरीत उज्बेकिस्तानच्या नोदिरजोन सफरोवला 9-2ने पराभूत केले. त्यानंतर फलस्तीनच्या अली एम एम अबुयमैला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.

दुसरीकडे, बजरंगने सुरुवातीच्या सामन्यात सहज विजय संपादन केला. 65 किलो वजनगटातील सुरुवातीच्या सामन्यात त्याने कोरियाच्या योंगसियोग जियोंगवर सहज विजय मिळवला. त्यानंतर मंगोलियाच्या बिलगुन सरमानदाखला चितपट करत त्यानेही अंतिम फेरीत धडक मारली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.