वूर्स्टर (लंडन) – इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मितालीराज महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.
भारतीय संघाला विजय मिळवून देताना तिने 86 चेंडूंत नाबाद 75 धावांची खेळी केली. दरम्यान महिला क्रिकेट विश्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणाऱ्या मिताली राजची धावांची भूक अजूनही कमी झालेली नाही.
विक्रम हे माझ्या फलंजदाजीच्या कारकिर्दीचे एक परिमाण झाले. धावांची भूक यापुढेही कायम राहणार असे मितालीने सांगितले.
मितालीच्या कारकिर्दीला 26 जून 1999 पासून सुरवात झाली., ‘आजपर्यंत अनेक गोष्टी घडून गेल्या. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अडथळ्यांची शर्यतच म्हणा हवं तरं. पण, नेहमीच अशा स्पर्धेला महत्व दिले.’ असे मितालीने सांगितले.
मितालीने टी 20 क्रिकेटमधून 2019 मध्येच निवृ्त्ती घेतली आहे. आता पुढील वर्षी होणारी एकदिवसीय विश्वकरडंक स्पर्धा आपली अखेरची असेल, याचे संकेतही तिने दिले.
मितालीचा विश्वविक्रम
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 7304 धावांचा विक्रमही मितालीच्या नावावर
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विश्वविक्रम, नाबाद 75 धावांची खेळी साकारताना मितालीने इंग्लंडच्या चार्लट एडवर्ड्सला मागे टाकले.
- भारताचे नेतृत्व करताना मितालीने तिन्ही प्रकारांत एकूण 6015 धावा केल्या आहेत. यात मात्र कर्णधार चार्लट एडवर्ड्स (6728 धावा) तिच्यापेक्षा पुढे आहे.
- मितालीने कारकीर्दीत सर्वाधिक 87 वेळा 50 हून अधिक धावा, आठ शतकेही यात समाविष्ट
- मितालीची एकदिवसीय कारकीर्द 22 वष्रे आणि 7दिवस अशी सर्वात प्रदीर्घ आहे. प्रदीर्घ कसोटी कारकीर्दीत तिचा (19 वष्रे आणि 156 दिवस) तिसरा क्रमांक
फलंदाज धावा सामने
मिताली राज 10227 – 317
चार्लट एडवर्ड्स 10273 – 309
सुझी बेट्स 7849 – 247