सातारा -पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामागांवर आनेवाडी टोलनाका ते रायगाव फाटा या दरम्यान होंडा ऍक्टिव्हा दुचाकी रस्ता दुभाजकाला सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास धडकून ऍड. सौ. स्मिता महेंद्र पवार (वय 38) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भुईंजचे सपोनि आशिष कांबळे यांनी दिली. ऍड. स्मिता पवार या दर शनिवार-रविवार माहेरी कडेगाव येथे जात आणि दर सोमवारी पुन्हा सातारला जात. त्या आपल्या मुलाला भेटून सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास सातारला जात असताना अपघात झाला. ऍड. स्मिता पवार या जिल्हा परिषदेत कौन्सेलर म्हणून काम करत होत्या.