पिंपरी, दि. 7 – जमीन विक्री करत असताना दोन एजंटांनी ग्राहकाची 30 लाखांची फसवणूक केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2013 पासून ते आज अखेरपर्यंत तळेगाव दाभाडे येथे घडला.याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयुब शेख, दिपक बोऱ्हाडे वएका महिलेच्या विरोधात तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांना त्यांची जमिन विकून देतो, त्यासाठी 4 लाख कमिशन असा व्यवहार ठरला होता. त्यासाठी चार कोरे चेकही फिर्यादी यांनी आरोपींना दिले होते. दरम्यान जमिनीसाठी दोन गिऱ्हाईक आले. त्यासाठी गिऱ्हाईकांनी 33 लाखांचे दोन चेक दिले होते. याची कल्पना आरोपींना होती. त्यांनी जमिनीत खोट आहे, त्यामुळे गिऱ्हाईकाने पैसे परत मागितले आहेत असे फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून आरोपींनी विश्वासघात करत 30 लाख रुपये आरोपींनी वापरले. तळेगाव पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.