मुंबई – 90च्या दशकातील ‘शक्तिमान’ ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. आठवड्यातून केवळ एकदाच प्रदर्शित होणारी ही मालिका जवळपास 12 वर्ष टिव्हीवर सुरु होती. या मालिकेचा शेवटचा भाग 2005 साली पोगो वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी शेवटच्या भागापर्यंत शक्तिमानच्या टीआरपीमध्ये घट झाली नाही. परंतु काही आर्थिक मतभेदांमुळे ही मालिका बंद करण्यात आली.
मात्र, आता हीच मालिका सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर ‘शक्तिमान’चा टिझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये शक्तिमानची झलक पाहायला मिळते. शक्तिमानचे सुरक्षा कवच, गंगाधरचा चष्मा. आयडी कार्ड आणि बॅकग्राऊंडला म्यूझिक ऐकू येत आहे. दरम्यान शहरातील अनेक बिल्डींग आणि त्यांच्यावर एक काळी सावली पडताना दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर हा टिझर प्रचंड व्हायरल झाला असून, भारताच्या या पहिल्या सुपरहीरोला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आहे. शक्तिमान ही मालिका 90च्या दशकात सुपरहिट ठरली होती. ही मालिका त्यावेळी अतिशय लोकप्रिय ठरली होती. मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले होते.