अमरोहा (उत्तर प्रदेश) – येथील एक युवक आपल्या नातेवाईकाशी फोनवर बोलत असताना त्याच्या फोनचा स्फोट झाला. त्यात त्याच्या बोटाला दुखापत झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेबाबत अमरोहा जिल्ह्यातील हिजामपूर गावात राहणारा हिमांशू नावाच्या युवकाने सांगितले की, मी कॉल करत असताना माझ्या मोबाईलला स्फोटामुळे आग लागली.
यात माझ्या बोटाला दुखापत झाली. मी अमरोहा येथून 31 ऑगस्ट 2022 रोजी हा मोबाईल खरेदी केला, मोबाईल खरेदीचा कॅश मेमोही त्याने दाखवला. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना देशभरात घडल्या आहेत.
डिसेंबर 2019 मध्ये मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एक 15 वर्षांचा मुलगा त्याच्या शाळेच्या ऑनलाइन वर्गात जात असताना मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने तो जखमी झाला. मार्च 2019 मध्ये एका 28 वर्षीय व्यक्तीला त्याच्या स्कूटरवरून जात असताना त्याच्या अगदी नवीन मोबाइल फोनचा स्फोट झाल्याने तो भाजला होता.