आरबीएल बँकेतील बचत खात्यावर व्याजदर
सर्व व्यावसायिक बँकांच्या तुलनेत आरबीएल बँक बचत खात्यावर सर्वाधिक व्याज दर देते. आरबीएलच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, RBL ही खासगी क्षेत्रातील बँक बचत खात्यावर 4.5 टक्के ते 6.25 टक्के व्याज देते.
या बँकेत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4.5 टक्के व्याज मिळतो. तर 1 लाख ते 10 रुपयांच्या ठेवींवर हा व्याजदर 6 टक्के आहे. त्याशिवाय आरबीएल बँकेत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर 6.25 टक्के दराने व्याज मिळतो.
बंधन बँकेतील बचत खात्यावर व्याजदर
बंधन बँक ही ग्राहकांच्या बचत खात्यावर 3 टक्के ते 6 टक्के व्याज देते. मात्र हा व्याज तुमच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, यावर अवलंबून असते. या बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार ही बँक 1 लाखांपर्यंतच्या ठेवींवर 3 टक्के व्याज देते. तर 1 लाख रुपये ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 4 टक्के व्याज दिला जातो. तर 10 लाखांहून अधिक ठेवींवर 6 टक्के दराने व्याज दिला जातो.
येस बँक बचत खात्यावर व्याजदर
येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, खासगी क्षेत्रातील Yes बँक बचत खात्यावर आपल्या ग्राहकांना 4 किंवा 5.5 टक्के दराने व्याज देत आहे. ही खासगी क्षेत्रातील बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4 टक्के दराने व्याज देते.
जर तुम्ही या बँकेत 1 ते 10 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरवर्षाला 4.75 टक्के दराने व्याज मिळेल. तर दररोज 1 लाख ते 100 कोटी रुपयांच्या ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळतो. दरम्यान कोणत्याही बँकेत बचत खाते उघडण्यापूर्वी त्या बँकेचा व्याजदर नक्की तपासा. त्यासोबतच इतरही सेवांची माहिती घेऊनच गुंतवणूक करा.