पुणे – अनंत चतुर्दशी गुरूवारी (दि. 28) आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह राज्याच्या विविध भागातून नागरिक शहरात येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. अशा ठिकाणी वाहने लावता येणार आहेत.
या प्रमाणे पार्किंग व्यवस्था असेल : न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग, शिवाजी आखाडा वाहनतळ, देसाई कॉलेज, हमालवाडा, पत्र्यामारुती चौकाजवळ, गोगटे प्रशाला, एसपी कॉलेज, नदी पात्रालगत, शिवाजी मराठा शाळा, नातूबाग, पीएमपी मैदान पूरम चौकाजवळ, पेशवे पार्क सारसबाग, हरजीवन हॉस्पिटलसमोर सावरकर चौक, पाटील प्लाझा पार्किंग, मित्रमंडळ सभागृह, पर्वती ते दांडेकर पूल, दांडेकर पूल ते गणेशमळा, गणेशमळा ते राजाराम पूल, निलायम टॉकीज, विमलाबाई गरवारे हायस्कूल, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजिवनी मेडिकल कॉलेज मैदान, आपटे प्रशाला, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान, मराठवाडा कॉलेज, एसएसपीएमएस कॉलेज येथे वाहने उभी करता येतील.
याशिवाय गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर 11 ठिकाणी “नो पार्किंग’ झोन घोषीत करण्यात आले आहेत. या रस्त्यांवर केवळ पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि महावितरण यांच्या वाहनांशिवाय इतर वाहनांना मुख्य मिरवणूक मार्गांवर पार्किंग करण्यास बंदी असणार आहे.
सदर, रस्त्यांवर सायंकाळनंतर वाहने उभी करण्यात येतात, ती गुरूवारी (दि.28) उभी करण्यात येऊ नयेत, मिरवणुकीदरम्यान वाहनांचे नुकसान होऊ शकते, अशी वाहने उभी केल्यास ते उचलण्यात येणार असून संबंधीत वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे वाहतूक पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
या रस्त्यांवर पार्किंगला बंदी…
लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौक ते टिळक चौक
केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक
कुमठेकर रस्ता : शनिपार चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक
बाजीराव रस्ता : पूरम चौक ते फुटका बुरूज चौक
शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
शास्त्री रस्ता : सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक
जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक
कर्वे रस्ता : नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक
फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता : खंडोजीबाबा चौक ते गुडलक चौक
खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांच्या 100 मीटर परिसरात पार्किंगसाठी बंदी