Pune Porsche Car Accident। पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला असून अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्द केला आहे. याउलट त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे.
14 दिवसांसाठी 5 जूनपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.
या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. अशात अग्रवाल आणि पवार कुटूंबाचे संबंध म्हणूनच सुप्रिया सुळे गप्प आहे असा गंभीर आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.
नितेश राणे म्हणाले,’नेहमी बोलणाऱ्या सु्प्रिया सुळे या पुणे अपघातावर गप्प का आहेत ? असा सवाल राणे यांनी विचारला आहे. शरद पवार गटातून या घटनेवर प्रतिक्रिया का येत नाही ? सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का ? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले,’नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत ? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ? प्रत्येक गोष्टीवर, उठसूठ देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या पुण्याच्या घटनेवर मात्र गप्प का ? त्यांचे या घटनेतील कुटुंबाशी संबंध होते का ? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? कारण आरोपीला जो वकील देण्यात आला आहे, तो पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे समजते,’ असा आरोप नितेश राणे यांनी केला.