“आतापर्यंत समोर आलेल्या…”; साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, सुषमा अंधारे ‘त्या’ मागणीवर ठाम म्हणाल्या…

Chief Minister Devendra Fadnavis : साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता. जिल्ह्यातील सावरी या गावात पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.
माननीय मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांना बोलताना उपमुख्यमंत्र्यांना क्लीन चीट देण्याचा पुन्हा एकदा धाडसी प्रयत्न केला आहे. ( आपल्याला त्यांची खरेच किती काळजी आहे हे मी पुन्हा कधीतरी स्पष्ट करेल)
तूर्तास माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया न्यायव्यवस्थेचा आदर राखा.… pic.twitter.com/JI49bU53O0— SushmaTai Andhare (@andharesushama) December 19, 2025
फडणवीसांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत एकनाथ शिंदेंचा याप्रकरणात संबंध आहे, असे माझे म्हणणे नाही. मी प्रकाश शिंदे यांच्याबद्दल बोलते. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असण्याचा फायदा प्रकाश शिंदेंना होऊ शकतो. प्रकाश शिंदे तपास प्रभावित करु शकतात. त्यामुळे काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून लांब राहावे, ही माझी मागणी आहे, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केली आहे.
कोकाटे प्रकरणावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोघम भाष्य करत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून असे दिसते की त्यांनी याविषयी अधिकचे बोलणे टाळले आहे.




