Devendra Fadnavis – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सध्या ६ हजार कोटींची कामांचा शुभारंभ झाला असून, 20 हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ मेळा सुरू होईपर्यंत एकूण 25 हजार कोटींची कामे पूर्णत्वास जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नाशिक येथे कुंभमेळ्याच्या कामांच्या शुभारंभवेळी बोलत होते. फडणवीस बोलताना म्हणाले की, निधी कमी पडू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध आहेत. आम्ही माणूस आहोत. आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी आम्हाला सांगा. तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. चूक झाली तर आम्ही पुन्हा ती सुधारू, असे आवाहन त्यांनी साधू संतांना केले आहे. ते पुढे म्हणाले की, प्रयागराजला कुंभमेळा झाला. त्यात जगातील सर्वात मोठा आस्थेचा कुंभ भरला होता. 75 वर्षानंतर त्रिखंड योग असल्याने यंदाचा कुंभ विशेष आहे. हा कुंभ दीर्घकाळ चालणार आहे. याच परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ आहे. गोदावरीत स्नान करण्यासाठी भाविक येत असतात. प्रयागराजला १५ हजार हेक्टर जागा आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला एकत्रित ५०० एकर जागा आहे. त्यामुळे कमी जागेत कुंभ भरावावा लागतो. मागील कुंभ ही यशस्वी कुंभमेळा पार पडला. यावेळी 5 पट जास्त भाविक येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय राखून काम केल्याने मोठे काम होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या लोकांची मदत होत आहे. काही लोकांना विस्थापित व्हावे लागते. त्याला लोक तयार झाले. मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सांगितले आहे की, निधीची कमतरता भासू देणार नाही. 12 वर्षानी कुंभ येतो, त्यामुळे आम्ही काम करत आहोत. गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे. गोदावरी निर्मळ झाली पाहिजे. इथे घाट बांधत आहोत. जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहोत, असे त्यांनी सांगितले.