Rahul Gandhi property : कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे २० कोटी रूपये मुल्याच्या संपत्तीचे धनी आहेत. त्यांच्या हाती सध्या ५५ हजार रूपयांची रोख रक्कम आहे. मागील ५ वर्षांत त्यांच्या संपत्तीत ४ कोटी रूपयांहून अधिक वाढ झाली आहे.
केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल पुन्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानुसार, राहुल यांच्याकडे ९ कोटी २४ लाख ५९ हजार २६४ रूपये किमतीची जंगम मालमत्ता आहे. त्यांनी स्वत:हून कमवलेल्या स्थावर मालमत्तेचे खरेदी मुल्य सुमारे ८ कोटी रूपये इतके दर्शवले आहे. | Rahul Gandhi property
त्या मालमत्तेचे सध्याचे बाजार मुल्य ९ कोटी ४ लाख ८९ हजार रूपये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यांना वारसा हक्काने २ कोटी १० लाख रूपयांची संपत्ती मिळाली आहे. त्यांना ४९ लाख ७९ हजार रूपयांचे देणे चुकते करायचे आहे. मागील निवडणुकीवेळी राहुल यांनी जवळपास १६ कोटी रूपयांची संपत्ती त्यांच्याकडे असल्याचे जाहीर केले होते. त्याआधी २०१४ यावर्षी त्यांच्या संपत्तीचे मुल्य ९ कोटी ४० लाख रूपये होते. | Rahul Gandhi property
मागील वेळी (वर्ष २०१९) राहुल यांनी वायनाड आणि उत्तरप्रदेशातील अमेठी या दोन मतदारसंघांमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मागील वेळी त्यांनी वायनाडमधून विजय मिळवला. मात्र, अमेठीत ते भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. | Rahul Gandhi property