पुणे – वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौकातील पाणीटाकीला जोडणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती सोमवारी (दि.20) दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे वारजे, शिवणे, पाषाण, सुतारवाडी, बाणेर-बालेवाडी परिसरांतील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उशीरा आणि कमी दबाने पाणी सोडण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
बाणेर-पाषाण लिंक रोड, गणराज चौक, बाणेर हिल, सदानंद चौक, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सॅंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनीत चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहननगर, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर इत्यादी.
वारजे जलशुद्धीकरण केंद्राचा परिसर अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर, कोंढवे धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.