पिंपरी (प्रतिनिधी) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर, कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगनगर परिसरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिकांनी मतदान करुन आपला हक्क बजवावा, मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले.
मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो. आन बान शान से, सरकार बने, सरकार बने मतदान से, अशा घोषणा देत मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी, कामगार कल्याण केंद्र उद्योगनगर प्रमुख प्रदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे नोडल अधिकारी राजाराम सरगर, प्रिन्स सिंह, दीपक यानावर, संजू भाट, आनंद पाथरे, राजेंद्र फडतरे, नम्रता बांदल, मनोहर कड, प्रिया पुजारी, रंजना जोशी, रमेश सरदेसाई, विजय आगम, मीनाक्षी मेरुकर, संध्या स्वामी, प्रदीप बांदल आणि ६० सभासद सहभागी झाले होते.