Vladimir Putin Reaction On Gaza Attack : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा इस्रायल-हमास युद्धाबाबत वक्तव्य केले आहे. हमासने इस्रायलवर क्रूरपणे हल्ले केले पण आता इस्रायलकडून होत असलेले हल्लेही क्रूरच असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत इस्रायल-हमास युद्ध रशिया रोखू शकतो असा दावा देखील पुतीन यांनी केला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पहिल्यांदाच देशाबाहेर पडले आहेत. किरगिझस्तानच्या राजधानीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी या युद्धाविषयी प्रतिक्रिया दिली. याविषयी बोलताना,”मध्यपूर्वेत काय चालले आहे याची रशियाला जाणीव आहे. इस्रायलने गाझा परिसराला वेढा घातला आहे. इस्रायल सातत्याने हवाई हल्ले करत आहे.
पुतीन म्हणाले,”गाझावरील हल्ल्यांबाबत अमेरिकेत चर्चा सुरू आहे, गाझाला वेढा घालण्याची चर्चा आहे. “दुसऱ्या महायुद्धात लेनिनग्राडला वेढा घातला होता त्याप्रमाणे इस्रायलगाझा वेढा घालत आहे.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी, “माझ्या दृष्टिकोनातून, हे अस्वीकार्य आहे. तेथे (गाझा) २० लाखाहून अधिक लोक राहतात. हे सर्व लोक हमासचे समर्थन करत नाहीत, परंतु महिला आणि मुलांसह सर्वांनाच याचा त्रास होईल.” गाझा भागातील लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत ते म्हणाले, साहजिकच हे कोणालाही मान्य करणे सोपे नाही. पुतीन यांनी इस्त्रायल-गाझामधील अलीकडचे संकट चर्चेद्वारे सोडविण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंशी संबंध असल्याने रशिया मदत करू शकते, असेही ते म्हणाले.