Virat Kohli : विराटच्या खिलाडीवृत्तीने जिंकली मनं! स्वतःला बाद करणाऱ्या युवा गोलंदाजाला दिले खास गिफ्ट, पाहा VIDEO

Virat Kohli displayed remarkable sportsmanship : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने धमाका करत आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत दिल्लीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराटने आपल्या खेळाने तर चाहत्यांना भुरळ घातलीच आहे, पण त्यासोबतच त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीची सध्या क्रीडा विश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. गुजरात विरुद्धच्या सामन्यात स्वतःला बाद करणाऱ्या युवा गोलंदाजाला विराटने एक अविस्मरणीय भेट दिली.
विशालच्या जाळ्यात अडकला विराट –
विराट कोहलीने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आंध्र प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला होता. दुसऱ्या सामन्यात गुजरातविरुद्ध खेळतानाही तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. मात्र, ७७ धावांवर असताना गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज विशाल जैस्वालने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. विशालने टाकलेल्या ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर विराटने पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला आणि तो यष्टीचीत होऊन माघारी परतला.
Gujarat bowler Vishal Jayswal gets signed match ball from Virat Kohli after Vijay Hazare Trophy clash
Read @ANI Story | https://t.co/9mVKqiVHyS #VishalJayswal #Viratkohli #VHT2025 #VijayHazareTrophy #DelhivsGujarat pic.twitter.com/yIfaO0IUHm
— ANI Digital (@ani_digital) December 26, 2025
मैदानातील प्रतिस्पर्धी, मैदानाबाहेर मार्गदर्शक –
View this post on Instagram
विराटसारख्या दिग्गज फलंदाजाला बाद करणे हे कोणत्याही युवा गोलंदाजासाठी स्वप्नवत असते. विशाल जैस्वालचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. मात्र, सामना संपल्यानंतर विराटने जे केले, त्याने विशालचा दिवस अधिकच खास बनवला. विराटने मोठ्या मनाने विशालला बोलावून ज्या चेंडूवर तो बाद झाला, त्याच ‘मॅच बॉल’वर आपली स्वाक्षरी दिली आणि त्याच्यासोबत फोटोही काढला.
हेही वाचा – MS Dhoni : भाईजानच्या पार्टीत कॅप्टन कूलचा जलवा! सलमानच्या ६०व्या बर्थडेला धोनीची हजेरी, VIDEO व्हायरल
विशालची भावूक पोस्ट –
View this post on Instagram
विशाल जैस्वालने या अविस्मरणीय क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ज्या फलंदाजाचा जगभर डंका आहे, त्यांच्यासोबत खेळणे आणि त्यांना बाद करणे ही माझ्यासाठी कल्पनेपलीकडची गोष्ट होती. विराट भाईला बाद केल्याचा क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही.”
हेही वाचा – AUS vs ENG : आऊट की नॉट आऊट? लाबुशेनच्या विकेटवरुन पेटला वाद, रुटने घेतलेल्या कॅचचा VIDEO व्हायरल
विराटच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक होत आहे. एका बाजूला आक्रमक खेळ आणि दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची त्याची ही वृत्ती नव्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





