Mohammed Shami Statement : “माझ्याशी कोण आणि का बोलेल?” न्यूझीलंड दौऱ्यातून पत्ता कट झाल्यानंतर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
Mohammed Shami Statement : मंगळवारी, मोहम्मद शमीने असे विधान केले आहे, ज्यावरून असे सूचित होते की टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे तो निवड समितीवर नाराज आहे.

Mohammed Shami Painful Statement on Selection Snub From New Zealand Tour : न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघातून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात आले आहे. इतकेच नाही तर भारत ‘अ’ संघाच्या दौऱ्यातही त्याला स्थान मिळालेले नाही. सततच्या या दुर्लक्षामुळे निवडकर्त्यांनी शमीबाबतचा विचार पूर्णपणे सोडून दिला आहे का, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, रणजी करंडक सामन्यात बंगालला विजय मिळवून दिल्यानंतर शमीने निवड समितीच्या संवादावर थेट बोट ठेवत आपली खदखद उघडपणे बोलून दाखवली आहे.
मी कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही, माझ्याशी कोण आणि का बोलेल?
निवड समितीशी काही संवाद झाला का, असे विचारले असता शमीने अत्यंत वैतागून आणि रोखठोक उत्तर दिले. तो म्हणाला, “सर, मी सध्या भारतीय संघात नाही आणि बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्येही नाही. अशा वेळी माझ्याशी कोण बोलेल आणि कशासाठी बोलेल?” संवादाच्या अभावामुळे निराशा स्पष्टपणे जाणवत असली तरी शमीने हार मानलेली नाही. संघात नसलो तरी देशांतर्गत सामने खेळत राहून स्वतःला आगामी स्पर्धांसाठी तंदुरुस्त ठेवणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्याने स्पष्ट केले.
आजही मी पीकवरच; फिटनेसवरील चर्चांना सडेतोड उत्तर –
🔹 On hopes of an India recall
🔹 On Bhuvneshwar Kumar’s return to the T20I setup
🔹 On his chances of returning for the 2027 ODI World CupMohammed Shami’s last international outing was the Champions Trophy final in March 2025.
Shami did not feature in Bengal’s second-round fixture against Services in the ongoing Ranji Trophy, arguably due to the spin-friendly nature of the surface at Palam.
Read the full story here ➡️ https://t.co/mYkrQ0uNFP
✍️: @vivek9301
#RanjiTrophy #Shami #IndianCricket
— Sportstar (@sportstarweb) October 20, 2026
आपल्या फिटनेसवर उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकांवर शमीने सडेतोड प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, “सर, आम्ही आजही आमच्या पीकवरच आहोत. यात खोटे बोलण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही जसे आहोत, सर्वोत्तम स्थितीत आहोत.” गेल्या वर्षीही संपूर्ण देशांतर्गत हंगाम खेळल्याची आठवण करून देत, देशांतर्गत क्रिकेट खेळल्याने आयपीएल आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटची तयारी अधिक भक्कम होते, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
२०२७ च्या विश्वचषकाचा विचार नाही; वर्तमानावर भर –
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत विचारले असता शमीने फार पुढचा विचार करणे टाळले. तो म्हणाला की, “उद्या कोणासोबत काय घडेल किंवा परिस्थिती कशी असेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे इतका पुढचा विचार करण्यात अर्थ नाही. सध्या मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग कौशल्य आणि फिटनेस सुधारण्यासाठी करणे हेच एका खेळाडूचे मुख्य काम असते आणि आपण सध्या त्यावरच लक्ष केंद्रित करत आहोत.”
भुवीच्या पुनरागमनाचे स्वागत; बंगालशी अखेरपर्यंत एकनिष्ठ
Mohammed Shami Comeback: ‘मैं टीम में नहीं हूं…’, टीम इंडिया में वापसी पर शमी का बड़ा बयान
#MohammedShami #ShamiComeback #TeamIndia #RanjiTrophy #ShamiFitness #CricketNews #WorldCup2027 #IndianCricket #TeamIndiaComeback #MohammedShamiInterview #Sports https://t.co/qSLrqN7EMq— Asianetnews Hindi (@AsianetNewsHN) October 20, 2026
अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या चार वर्षांनंतर झालेल्या पुनरागमनावर आनंद व्यक्त करत शमी म्हणाला की, “भुवी ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यानुसार त्याचे पुनरागमन खूप आधीच व्हायला हवे होते.” याशिवाय बंगाल क्रिकेटबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शमी म्हणाला की, “या संघाने मला नाव दिले आहे आणि माझा शेवटचा सामनाही याच संघासाठी असेल. आपण खेळाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, बाकी गोष्टी आपल्या हातात नसतात.”





