Virat Kohli Santa : विराटने सांताक्लॉज बनून दिलं सरप्राइज, मुखवटा काढताच मुलांनी काय केलं? पाहा VIDEO

Virat Kohli Santa Claus Video Viral : आज २५ डिसेंबर, संपूर्ण देशभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चक्क सांताक्लॉज बनून लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करताना दिसत आहे. दुसरीकडे, मैदानातही विराटने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडत चाहत्यांना ख्रिसमसची खास गिफ्ट दिले आहे.
‘किंग कोहली’ सांता बनून पोहोचला आश्रमात –
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेला हा व्हिडिओ २०१९ मधील आहे. कोलकाता येथील एका आश्रमातील लहान मुले ख्रिसमसनिमित्त सांताकडे आपल्या आवडीच्या भेटवस्तू मागत होती. कोणाला ख्रिस्तियानो रोनाल्डोला भेटायचे होते, तर कोणाला स्पायडर-मॅन आणि विराट कोहलीला. मुलांच्या या इच्छा ऐकून विराट स्वतः सांताक्लॉजच्या वेशात तिथे पोहोचला. त्याने मुलांना भेटवस्तू दिल्या, पण जेव्हा त्याने आपला सांताचा मुखवटा काढला, तेव्हा मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. समोर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला पाहून मुलांनी त्याला प्रेमाने मिठी मारली. हा जुना व्हिडिओ आजही चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.
When @imVkohli turned Santa! 😍 🎅
Throwback to a heartwarming Christmas surprise for little kids at a shelter home in Kolkata! 🎁🤩🎄
Merry Christmas & a Happy New Year! ❤️✨ pic.twitter.com/QOW7NY7JJn
— Star Sports (@StarSportsIndia) December 24, 2025
मैदानातही धमाका; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला –
विराट कोहलीने यंदाचा ख्रिसमस खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला आहे. २४ डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने केवळ ८३ चेंडूत शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीसह विराटने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १६,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, या पराक्रमासह त्याने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहित भाई, वडापाव खाणार का?’ चाहत्याच्या ऑफरवर हिटमॅनने काय दिली रिऍक्शन? पाहा VIDEO
रोहित-विराट जोडीचा पुन्हा जलवा –
याच स्पर्धेत मुंबईकडून खेळताना रोहित शर्मानेही १५५ धावांची वादळी खेळी केली होती. एकाच दिवशी भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गज खेळाडूंनी शतके ठोकल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा ख्रिसमस सण दुहेरी आनंदाचा ठरला आहे. विराटची ही कामगिरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून, “किंग इज बॅक” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.





