साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाचा “लाईगर’ बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. या धमाकेदार टिझरमध्ये दर्शकांना MMA फाईट सिक्वेन्स, तसेच ‘स्लम डॉग ऑफ द स्ट्रीट्स ऑफ मुंबई’ आणि ‘चाय वाले’ यांच्या संघर्षाची झलक पाहायला मिळते. “लाईगर’मध्ये जगद्विख्यात बॉक्सिंगपटू माईक टायसन देखील दिसणार आहे.
“लाईगर’चे डायरेक्शन प्रसिद्ध डायरेक्टर पुरी जगन्नाथ करणार आहेत. “लाईगर’मध्ये विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग गोव्यामध्ये सुरू आहे. “लाईगर’मध्ये विजय देवरकोंडा एका किक बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
हा चित्रपट एकाच वेळी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. “लाईगर’ यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र थिएटर उघडण्याची घोषणा उशिरा झाल्यामुळे सिनेमाचा रिलीज पुढे ढकलला गेला आहे.