इंदापूरच्या निवडणुकीत ‘शरयू’चा वाटा

फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्याकडून प्रभावी प्रचार

भवानीनगर – इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत मातब्बर नेतेमंडळी आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना सोडून गेले तरी भरणे हे विजयी झाले. या विजयात शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी केलेल्या दमदार प्रचारामुळे आणि सर्वसामान्य जनतेने भरणे यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाला न्याय दिला. त्यामुळे आमदार भरणे हे इंदापूरचे दुसऱ्यांदा कारभारी बनले आहेत.

इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीचे काही मातब्बर नेत्यांनी साथ सोडली. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना जाहीर साथ दिली. संपूर्ण राज्यात इंदापूरची निवडणूक अतितटीची झाली होती. भरणे यांच्यापुढे प्रचाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जे काही सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी आहेत, त्यांच्याबरोबर भरणे यांनी प्रचाराला सुरूवात केली. यात प्रचाराचा नारळ शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला. त्यावेळेपासून प्रचाराच्या सांगता सभेपर्यंत शर्मिला पवार यांनी सहकाऱ्यांबरोबर भरणे यांचा गावोगावी जाऊन प्रचार केला.

पाच वर्षे ते तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करीत आहेत. स्वतःच्या खर्चाने शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्‍यासाठी दोन जेसीबी मशीन दिल्या आहेत. कोणताही मोबदला न घेता शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम करताना फक्‍त त्या जेसीबी मशीनमध्ये डिझेल भरून मशीन वापरावे, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील 600 विहिरी नव्याने निर्माण झाल्या आहेत. हीच सामाजिक जाण सर्वसामान्य जनतेने लक्षात घेऊन भरणे यांच्या पाठीमागे ठाम राहिले. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा विजयी झेंडा फडकला.

तळागाळातील जनतेला साथ देणारे भरणे – 
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते इंदापूरचे आमदार असा प्रवास भरणे यांनी केला आहे. त्याकाळात तालुक्‍यातील गोरगरीब जनतेच्या चुलीपर्यंत जाणारा एकमेव आमदार म्हणजे इंदापूर तालुक्‍याचा “दत्तामामा’ हाच एक शब्द तालुक्‍यात परिचयाचा झाला होता. तळागाळातील जनतेच्या हाकेला कायम भरणे हे धावून जातात. जातीचे समीकरणे बाजूला सारत सर्वसामान्य जनता काय करू शकते, याचेच उदाहरण इंदापूर तालुक्‍याचे आमदार दत्तात्रय भरणे हे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.