नवी दिल्ली – मंदिरात दर्शनासाठी आलेल्याला जोरदार मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. वृंदावन येथील बांके बिहारी मंदिरातील हा प्रकार असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात हे मंदिर आहे.सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
बांके बिहारी मंदिरातील व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भक्त आणि मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालताना दिसत आहे. त्याचे रूपांतर हाणामारीत होते आणि सुरक्षा रक्षक कोणतीही तमा न बाळगता त्या व्यक्तीला झोडायला सुरुवात करतात. विशेष म्हणजे भक्तांमधील बाजूलाच असलेल्या एकाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढल्याचे समजते.
View this post on Instagram
यावेळी इतर भक्त एका बाजूला होतात तर सुराक्षा रक्षक दोघा तिघांना जोर जोरात मारताना दिसत आहेत. या मारहाणीचे नेमकं कारण काय होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक यावर भाष्य करत आहेत. काहींनी त्या व्यक्तींप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे तर काहींनी याचे नेमके कारण काय होते याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.