नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात येणार आहेत. त्यांचे जंगी स्वागत आज केले जाणार आहे. स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोने दान करणार आहे.
कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानाने लॉस अँजलिसवरुन ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे मुंबईत दाखल होणार आहेत. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असणार आहे. बाळांच्या स्वागतासाठी ईशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसेच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केली जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील.
दरम्यान, बाळांसाठी Hermes, Dior या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’मध्ये तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी dolce gabbana, Gucci, Loro piana या ब्रँडचे खास कपडे तयार करण्यात आले आहेत. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे.
बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचे 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी लग्न झाले होते.