Entertainment – अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रणदीप भारतीय जवानांसोबत काही बॉलिवूड गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तो खूप धमाल मस्ती करताना दिसत आहे. काही वेळ भारतीय जवानांसोबत घालवल्याने तिचे अनेकजण कौतुक करत आहेत.
रणदीपने सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. त्यानंतर तेथील चुना गावात हे तिघे भारतीय लष्करातील सैनिकांसोबत गांधी जयंती हा दिवस साजरा करण्यासाठी सामील झाले. यावेळी रणदीप मोहम्मद रफींच्या ‘सर जो तेरा चक्राये’ या गाण्यावर भारतीय जवानांसोबत ठेका धरताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या चाहत्यांच्याही पसंतीस पडला आहे.
या दरम्यान रणदीपने एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला की, “माझी ईशान्येकडील राज्यांना ही पहिलीच भेट आहे. आपल्या देशाचा एवढा सुंदर भाग पाहून माझा खरोखरंच आनंद द्विगुणीत झाला. तिबेट- चीन सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसोबत डान्स करताना, मला खूप आनंद झाला. या डोंगराळ भागात डान्स करताना माझे ते मनोबल वाढणारे होते.”
#WATCH | Tawang, Arunachal Pradesh: Actor Randeep Hooda dances with the soldiers of the Indian Army and ITBP in the Mago Chuna area.
He was here to celebrate Gandhi Jayanti with them. pic.twitter.com/Ea1zEmKK7b
— ANI (@ANI) October 2, 2023
दरम्यान, रणदीप लवकर स्वातरी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो विनायक दामोदर सावरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या लुकची विशेष चर्चा झाली होती. या भूमिकेसाठी त्याने खुप मेहनत घेतल्याचे देखील म्हंटले जात आहे. त्याचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु चाहते रणदीपला सावरकरांच्या भूमिकेत पाहण्यास आतुर झाले आहेत.