मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan)’ रईस’ चित्रपटातील अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) विवाहबंधनात अडकली आहे. सध्या तिच्या लग्नाचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिरा खानने सलीम करीम याच्यासोबत रविवारी (1 ऑक्टोबर) रोजी लग्न केले. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
माहिराचा मॅनेजर अनुशय तलहा खानने इन्स्टाग्राम लग्नातील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यात माहिरा सलीमकडे चालत जात असल्याचे दिसते. यावेळी माहिराला पाहून सलीम भावूक झाल्याचे दिसते. माहिरा वधुच्या वेशात फारच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला होता आणि ओढणीने आपला चेहरा झाकून घेतला होता. अभिनेत्रीच्या या क्यूट लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर सलीमने काळ्या रंगाची शेरवानी आणि त्यावर निळ्या रंगाची पगडी परिधान केली होती.
View this post on Instagram
लग्नातील माहिरा आणि सलीमचा हा लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडला असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, माहिरा खान दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे. माहिराने 2007मध्ये पहिलं लग्न अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अली अक्सरसोबत झाले होते. माहिराला अली अक्सरपासून अलझान नावाचा मुलगा आहे. मात्र 2015 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता माहिराने पेशाने बिझनेसमन असलेल्या सलीम करीमसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.