मुंबई – बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शिव ठाकरेच्या (Shiv Thackeray) घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे शिवच्या घरी वर्दीतल्या गणपती म्हणजेच पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या बाप्पाचं आगमन झाले आहे. तसेच या खास गणपतीचे पोलिसांच्या हस्ते स्वागत करण्यात आले आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिवने यंदाच्या गणपतीची ‘पोलीस’ थीम ठेवली आहे. यानिमित्त त्याने रात्रंदिवस सेवेत तत्पर असलेल्या मुंबई पोलिसांना अनोखी मानवंदना दिली आहे. शिव ठाकरेच्या गणपती बाप्पाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. तसेच त्याच्या या आगळ्या वेगळ्या गणपतीचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शिव ठाकरेच्या बाप्पाने खाकी वर्दी परिधान केल्याचे दिसते. तसेच त्याच्या हातात वायरलेस फोन दिल्याचेही पाहायला मिळत आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवच्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत शिवणे गणपतीचे जल्लोषात स्वागत केले आहे. दरम्यान, उद्या गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणपतीचे आगमन होणार आहे. यानिमित्त राज्यभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.