मुंबई – सेमीकंडक्टर तुटवड्यामुळे या वर्षी वाहन उत्पादन 11 ते 13 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात क्रिसिल या संस्थेने म्हटले आहे की, उत्सवाच्या काळात मागणी वाढली असतानाच वाहन कंपन्या ग्राहकांना आवश्यक ते वाहन उपलब्ध करून देऊ शकत नाहीत.
या अगोदर या वर्षी वाहन उत्पादन 16 ते 17 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता गृहीत धरण्यात येत होती. मात्र दरम्यानच्या काळामध्ये सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा प्रश्न या उद्योगासमोर निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षापासून वाहन कंपन्यांनी सेमीकंडक्टरचा जास्तीत जास्त वापर करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे वाहने आधुनिक होण्यास मदत होते. अगोदर लोकप्रिय वाहनांसाठी ब वेटींगच्या निरीएड केवळ 2 महिने होता. तो आता नऊ महिन्यावर गेला आहे. करोनाच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणाऱ्या कंपन्यांनी सेमीकंडक्टरची मागणी नोंदवून ठेवल्यामुळे वाहन क्षेत्राला सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे.
सेमीकंडक्टरचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे चीनमधील कंपन्यांनी सेमीकंडक्टरची मोठ्या प्रमाणात साठेबाजी केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर हा प्रश्न निर्माण झाला आहे.