सुपरस्टार वरुण धवन पुन्हा एकदा नवरदेव बनणार आहे. खऱ्या आयुष्यात नाही तर रील लाईफमध्ये त्याला पुन्हा एकदा त्याचे चाहते नवरदेवाच्या भूमिकेत बघणार आहे.
वरुण धवन त्याच्या सुपरहिट रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ फ्रेंचायझीच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे, ज्यांनी दुल्हनिया फ्रँचायझीचे दोन्ही चित्रपट दिग्दर्शित केले होते. चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत होते. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
रिपोर्ट्सनुसार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक शशांक खेतान आणि वरुण धवन यांनी दुल्हनिया 3 च्या कथेसाठी अनेक कल्पनांवर चर्चा केली. पुढील वर्षी 2024 च्या उत्तरार्धात हा चित्रपट फ्लोरवर जाईल. या चित्रपटातही वरुण धवनसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वरून आलियाची ऑन स्क्रीन केमेस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
वरुण आणि आलियाचे ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’शी घट्ट नाते आहे. या दोन्ही स्टार्सच्या करिअरला पुढे नेण्यात दुल्हनिया फ्रँचायझीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचवेळी करण जोहरही आलिया आणि वरुणसोबत ‘दुल्हनिया 3’ बनवण्यासाठी खूप उत्सुक आहे. काही महिन्यांपूर्वीच करण जोहरने या चित्रपटाच्या सिक्वेलचे संकेत दिले होते. मात्र, तेव्हा चित्रपटाची कथा निश्चित झाली नव्हती. हा चित्रपट बघण्यासाठी चाहतेही उत्सुक आहे.