गाझियाबाद : वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अन्य एका प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गाझियाबाद न्यायालयाने वलीउल्लाला दोषी ठरवून निर्णय आधीच राखून ठेवला होता. 16 वर्षे जुन्या प्रकरणात गाझियाबाद कोर्टाने वल्लीउल्लाहला दोषी ठरवले होते.
न्यायालयाने वल्लीउल्लाला बॉम्बस्फोटाच्या दोन प्रकरणात दोषी ठरवले आहे, तर एका प्रकरणात निर्दोष सोडले आहे. वल्लीउल्लाला शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. बनारस येथील संकट मोचन मंदिरात झालेल्या स्फोटाप्रकरणी दुपारी 3.30 वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी वल्लीउल्लाला दोषी ठरवले. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता.
दशाश्वमेध घाटावर कुकर बॉम्ब सापडल्याच्या प्रकरणातही न्यायालयाने वल्लीउल्लाला दोषी ठरवले आहे. बॉम्बचा स्फोट होण्यापूर्वी बॉम्ब सापडला होता. तिसरी घटना रेल्वे कॅन्ट येथे बॉम्बस्फोटाची होती. येथे 9 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुराव्याअभावी वल्लीउल्लाची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी 23 मे रोजी न्यायालयात पूर्ण झाली. 7 मार्च 2006 रोजी वाराणसीतील संकटमोचन मंदिर आणि कॅन्ट रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला तर 76 जण जखमी झाले.
बनारसमधील एकही वकील वलीउल्लाच्या बाजूने लढायला तयार नव्हता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकरण गाझियाबाद न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासात या तीन बॉम्बस्फोटात पाच दहशतवाद्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले. यातील एक दहशतवादी मौलाना झुबेर हा बॉम्बस्फोटानंतर पुढच्याच वर्षी नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला होता. 5 एप्रिल 2006 रोजी पोलिसांनी लखनौमधील प्रयागराजमधील फुलपूर येथे वलीउल्लाला अटक केली होती.