मुंबई – 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता शहीद कपूर याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात मोलकरणीची एक छोटीशी भूमिका साकरणारी मराठमोळी अभिनेत्री ‘वनिता खरात’ हिने आपल्या उत्तम अभिनयाने महाराष्ट्रातील फॅन्सच्या मनात मोठे घर निर्माण केले. तिच्या या अभिनयाची सर्वत्र जबरदस्त चर्चा झाली होती. मात्र, प्रामुख्याने वनिता खरात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो “महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील नामांकित हास्यवीर आहे. वनिता आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवत असते. अनेक कलाकारांना याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. आणि यातूनच अभिनेत्री वनिता खरातही घराघरात पोहोचली आहे.
दरम्यान, ‘कबीर सिंग’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी वनिता आता नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वतः वनिताने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर याबद्दल माहिती दिली आहे. “सरला एक कोटी’ असं या वनिताच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिनेत्रीने एक कॅप्शन देखील लिहलं आहे. “डाव लागलाय मोठा काही लागणा मेळ… येडं झालंय गाव सारं सुरू झालाय खेळ… भाबड्या लोकांची डांबरट गोष्ट… ‘सरला एक कोटी’ असं तिने म्हंटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट 20 जानेवरी 2023 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, चित्रपटात मुख्य भूमिकेत ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सरताप, जतीन ईनामदार, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, कपिल कांबळे, शाम मते, शुभम खरे, योगेश इरतकर, अभिलाषा पॉल दिसणार आहेत.