किव्ह : रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. काळ्या समुद्रातील एका बेटावर रशियन युध्दनौकांनी बॉम्बिंग करण्याची धमकी दिल्यानंतरही युक्रेनच्या वीर जवनांनी त्याला भीक घातली नसल्याचे समोर येत आहे. मात्र कमकुवत समजल्या जाणाऱ्या युक्रेनने रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
रशियन टँक्स खेरसॉन शहरात घुसू नये म्हणून युक्रेनी सैनिकांनी शहराला जोडणारा पूल बॉम्बच्या सहाय्याने उडवून द्यायचे ठरवले होते. मात्र पूल उडविताना सैनिक शहिद होणार हे निश्चित होतं. अशा स्थितीत युक्रेनी मरिन बटालियनचे इंजिनिअर विटाली स्काकून वोलेडायमायरोविच यांनी ही जबाबादारी स्वीकारत पूल उडवून दिला. मात्र यात विटाली शहीद झाले.
युक्रेनच्या दक्षिण प्रांतात असलेल्या खेरसॉन शहरात रशियाने सैनिक घुसण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रशियाने मोठे टँक्स देखील या भागात पाठवलेले. ते टँक्स शहरात घुसू न देण्याचा निर्णय युक्रेनी जवानांनी घेतला. मात्र या शहरात प्रवेश करायाला गेनिच कार पुल हा अगदी श़ॉर्टकट रस्ता होता. त्यामुळे युक्रेनी सैनिकांनी तो पूलच उडवून द्यायचे ठरवले. मात्र तो पूल उडवत असताना युक्रेनने त्यांचा वीर जवान विटाली याला गमावावे लागले. विटालीला मरणोत्तर शौर्य पुरस्कारही जाहीर केला.