– निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे पक्ष नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या झोळीत टाकले. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागलेल्या उद्धव ठाकरेंना आज हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नाव व पक्षचिन्ह शिंदेंकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी, तिखट शब्दात एकनाथ शिंदे व भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकारपरिषदेत महत्वाचे मुद्दे
– निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार.
– देशात लोकशाही नाही हे लाल किल्ल्यावरून जाहीर करा.
– देशातील लोकशाही टिकणार कि नाही हे सर्वोच्च न्यायालयात ठरणार
– राणे, फडणवीस निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वीच शिंदे गटाला पक्ष व पक्षचिन्ह मिळणार हे कसं काय सांगत होते?
– देशात लोकशाही असायला हवं त्या सर्वानी एकत्र यायला हवं.
– निवडणूक आयोगाला हेच शेण खायचं होत तर आधीच खायचं होत.
– येत्या दोन, तीन महिन्यात स्थानिक निवडणुका लावण्याची शक्यता.
– लोकशाही टिकवायची असेल तर सर्वोच्च न्यायालय अखेरची उमेद.
– इलेक्शन कमिशन केंद्र सरकारचे गुलाम.
– शिवसेना नव्याने भरारी घेणार.
– कदाचित उद्या आमची मशाल पण काढून घेतील.
– चोर आज जल्लोष करतायेत.
– ते बाळासाहेबांना चोरू इच्छितात.
– आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव केलेला आज तेच पुन्हा करण्याची गरज.
– आमच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण कायम राहणार.
– मोदींची जादू महाराष्ट्रात चालत नाही म्हणून बाळासाहेबांचा चेहरा, धनुष्यबाण चोरला.