सातारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या माध्यमातून सातारा आणि जावळी तालुक्यातील 19 विकासकामांसाठी 2 कोटी 70 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून सातारा तालुक्यातील 3 आणि जावळी तालुक्यातील 16 विकासकामे मार्गी लागणार आहेत.
जावळी तालुक्यातील कुसुंबी येथील काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेची दुरुस्ती, शाळेस संरक्षक भिंत व मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी 25 लाख, हातगेघर येथील शैक्षणिक सेवा केंद्र संस्थेच्या शाळेच्या खोल्या दुरुस्ती व शौचालय दुरुस्तीसाठी 25 लाख, म्हाते बुद्रुक येथील कै. अण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीची व 5 शाळा खोल्यांची दुरुस्ती तसेच परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी 25 लाख, करंदी येथील जनता माध्यमिक विद्यालयाच्या शाळेची दुरुस्ती, शाळेस संरक्षक भिंत व मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी 25 लाख,
कुडाळ येथे पाचवड कुडाळ रस्ता ते रामभाऊ कुंभार घर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे 10 लाख, सोनगाव येथे बंदिस्त गटर आणि रस्ता कॉंक्रीट करणे 5 लाख, केंजळ येथे संरक्षक भिंत बांधणे 10 लाख, मामुर्डी येथे केदारेश्वर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे आणि मंदिराकडे जाणारा रस्ता करण्यासाठी 10 लाख, केसरकरवाडी येथे रस्त्याच्या कडेला बंदिस्त गटार बांधण्यासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
कुडाळ फुलवस्ती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक भरविणे 10 लाख, म्हाते खुर्द येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लाख. पाटणेमाची येथे अंतर्गत रस्ता खडीकरण करणे 10 लाख, म्हाते मुरा येथे काळेश्वर मंदिर ते राजमार्ग डांबरीकरण करणे 10 लाख, भोगवली मुरा अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 10 लाख, निपाणी मुरा अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 10 लाख, गाळदेव येथे अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे 10 लाख असा निधी मंजूर आहे.