कोठुन आणता असले पत्रकार? म्हणत केला इम्रानयांना सवाल
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भाग घेण्यासाठी जगभरातील अनेक नेते सध्या न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. त्यातच मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने ट्रम्प यांना काश्मीर संदर्भात प्रश्न विचारला. या ट्रम्प फक्त भडकले नाही तर त्यांनी पाक पंतप्रधान खान यांच्या समोर संबंधित पत्रकाराची इज्जत देखील काढली.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतवेळी पाकिस्तानच्या पत्रकारांनी काश्मीर संदर्भातील त्यांचा अजेंडा पुढे रेटला. ट्रम्प यांनी अनेक वेळा पाकिस्तानच्या पत्रकारांना चुकीच्या प्रश्नांबद्दल थांबवले. तरी देखील एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले, काश्मीरमध्ये गेले 50 दिवस झाले इंटरनेट बंद आहे, अन्न धान्य पुरवठा होत नाही अनेक गोष्टी बंद आहेत. यावर ट्रम्प म्हणाले तुम्ही जे बोलला आता तो प्रश्न नसून तुमचे स्वत:चे एक मत आहे. इतक नव्हे तर यावर ट्रम्प यांनी थेट इम्रान खान यांनाच विचारले, असले पत्रकार कोठून आणता तुम्ही? असे म्हणत त्यांनी त्या प्त्रकाराची केवळ लायकीच काढली नाही. तर, काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान आणि तेथील मीडियाकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लायकी काढली.