सिंगल चार्जमध्ये करा ‘मुंबई ते नागपूर’ प्रवास, Triton ने भारतात लॉन्च केली इलेक्ट्रिक एसयूव्ही

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता, अनेकांचा कल आता इलेक्ट्रीक वाहनांकडे आहे. त्यातच विविध कंपन्या अत्याधुनिक इलेक्ट्रीक कारची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच एका अमेरिकन वाहन कंपनीने भारतात ट्रायटन नावाची इलेक्ट्रीक एसयूव्ही लॉन्च केली आहे. Model H अस या एसयूव्हीचं नाव आहे.

भारतात उपलब्ध झालेली ही एसयूव्ही भारदस्त दिसते. Triton EV Model अमेरिकन एसयूव्हीसारखी दिसते, ज्यात चंकी फ्रंट फेस आणि मोठा ग्रिल देण्यात आला आहे.
या एसयूव्हीमध्ये आठ लोक सहज बसू शकतात.

यात 5,663 लीटर (200 क्यूबिक फूट) सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे. ही एसयूव्ही बाजारात सात रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच Triton Model H मध्ये 200kwh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यात हायपरचार्जचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी दोन तासांत चार्ज होऊ शकते.

दरम्यान सिंगल चार्जमध्ये ही कार १२०० किमी धावू शकते. अर्थात या एसयूव्हीमुळे एका चार्जमध्ये मुंबई ते नागपूर प्रवास सहज होऊ शकतो. तसेच या कारला भारतातून 2.4 बिलीयन डॉलर्सची ऑर्डर मिळाली आहे. या कारची किंमत १.०६ कोटी रुपये असल्याचं समजतं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.