गौतम गंभीर आणि उमर अब्दुल्ला यांच्यात रंगले ट्विटरयुद्ध

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप चांगलेच सुरु झाले आहेत. अशातच जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या घोषणापत्रात सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीर मधील अफस्पा (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट) काढण्याचे जाहीर केले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर राज्यासाठी वेगळा पंतप्रधान हवा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. त्यानंतर आज भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आणि भाजप मध्ये नुकताच प्रवेश घेतलेल्या गौतम गंभीर ने उमर अब्दुल्ला यांच्यावर ट्विट करत उमर अब्दुल्ला यांना झोपेची गरज असल्याचे म्हंटले होते. तसेच पुढे लिहीत झोपेनंतर त्यांनी गरम कॉफी घ्यावी आणि तरीही समजत नसेल तर पाकिस्तान मध्ये जावे असे म्हंटले होते.

तर उमर अब्दुल्ला यांनी देखील गौतम गंभीरवर पलटवार केला असून, गौतम गंभीरचे ट्विट रिट्विट करत, आपण कधीच क्रिकेट खेळलो नाही, कारण क्रिकेटमध्ये आपण फारसे चांगले नसल्याचे सांगितले, जम्मू-काश्मीर राज्याबद्दल आपणाला अधिक माहिती नाही. राज्यातील इतिहासाबद्दल आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स च्या भूमिकेला आपण नजरअंदाज करत असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आपल्याला माहित असलेल्या गोष्टींवर बोलण्याचा सल्ला उमर अब्दुल्ला यांनी गौतम गंभीरला दिला आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.